Nagpur Floods

Nagpur Floods । नागपूरमध्ये पुरामुळं एका महिलेचा मृत्यू; युद्धपातळीवर मदत कार्य सुरु, लष्कराच्या दोन तुकड्या दाखल

बातम्या

Nagpur Floods । नागपूर : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. परंतु काल रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल भरघोस नफा; जाणून घ्या या शेतीबद्दल सविस्तर माहिती

NDRF आणि SDRF च्या 2 तुकड्या 7 गटांत विभागल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत १४० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तर मूक-बधीर विद्यालयातील एकूण 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे.अग्निशमन दल देखील मदतीला धावून आले आहे. मुसळधार पावसामुळे अंबाझरी भागातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

PM Kusum Yojna । पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक; केंद्र सरकारचा इशारा, वाचा महत्त्वाची माहिती

दरम्यान, या भागात अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने शहरात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update । राज्यभर पावसाचे पुनरागमन, मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *