Eknath Shinde । शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार

बातम्या
Eknath Shinde

Eknath Shinde । राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ च्या विस्तारास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचा उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे. (Maharashtra Farmers Will Get Uninterrupted Electricity During The Day, Big Decision In Cabinet Metting )

Havaman Andaj । सावधान! पावसाबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

योजना अंतर्गत, २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट १६,००० मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. यामध्ये ९,००० मेगावॅट सौर ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट असून उर्वरीत ७,००० मेगावॅट म्हणजेच एकूण १६,००० मेगावॅट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमतेची निर्मिती होणार आहे. या विस्तारामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित होईल.

Pradhan Mantri G-One Yojana । प्रधानमंत्री जी-वन योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील अवशेषांपासून मिळणार फायदेशीर उत्पन्न

आर्थिक सहाय्याच्या बाबतीत, वीज उपकेंद्रांच्या देखभालीसाठी, ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि Revolving Fund साठी सन २०२४-२५ ते २०२८-२९ कालावधीसाठी २,८९१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सन २०२४-२५ साठी ७०२ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीला मान्यता मिळाली आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी ३०% (SGF) आर्थिक सहाय्य देण्यास मान्यता दिली आहे. याअंतर्गत सन २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीसाठी १०,०४१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. यातून २०२५-२६ साठी ६,२७९ कोटी व २०२६-२७ साठी ३,७६२ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदींना मान्यता देण्यात आली आहे.

योजना राबवल्यानंतर, महावितरणचा वीज खरेदीचा दर कमी होईल, ज्यामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा आर्थिक भार कमी होईल. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या यशस्वी कार्यान्वयनासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *