Maize Procurement

Maize Procurement । बारामती बाजार समिती केंद्रावर मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात, अशी करा नोंदणी

बातम्या

Maize Procurement । अनेक शेतकरी मका (Maize) पिकाचे उत्पादन घेतात. कारण या पिकाला जास्त पाणी आणि जास्त खतांची गरज नसते. शिवाय या पिकाला चांगली मागणी असते. अनेक पशुपालक जनावरांना चार म्हणून मका खरेदी करतात. अशातच आता मका उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बारामती बाजार समिती केंद्रावर (Baramati Bazar Samiti Kendra) मका खरेदीसाठी ऑनलाईन नावनोंदणीला सुरुवात झाली आहे.

Sugar Prices । सर्वसामान्यांना फटका! सणासुदीच्या काळात साखरेनं गाठला सर्वोच्च दर

१ ऑक्टोबरपासून ऑनलाईन नावनोंदणीला (Online registration for maize) सुरुवात झाली आहे, तुम्ही ३० नोंव्हेबरपर्यंत नावनोंदणीसाठी करू शकता. केवळ नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या मका प्रतिक्विंटल २ हजार ९० रुपये दराने खरेदी केल्या जातील, याबाबत बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन नावनोंदणी करा.

Kiwi Fruit । शेतकऱ्यांनो.. बक्कळ पैसा कमवायचा असेल तर करा किवी फळाची शेती, अशी करा लागवड

दरम्यान, सध्या मक्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बारामती बाजार समितीने सरकारकडे हमीभाव खरेदी केंद्राची मागणी केली होती, त्याला सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नावनोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा.

Sugarcane workers । गळीत हंगाम लांबणीवर पडणार? हार्वेस्टरप्रमाणेच टनाला 400 रुपये देण्यासाठी ऊसतोड मजुरांचा संप

आवश्यक कागदपत्र

शेतक-यांकडे नावनोंदणीसाठी मका पिकाची नोंद असणारा सात-बारा उतारा, आधारकार्डची छायांकित प्रत, चालु बॅक खाते अचूक तपशिलासह झेरॉक्स, मोबाइल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे असावीत. एकापेक्षा जास्त बँक खात्यांसाठी एकाच नोंद करू नये.

Pesticide Ban । सर्वात मोठी बातमी! सरकारने घातली ‘या’ चार कीटकनाशकांवर बंदी; लगेचच पाहा कोणते ते कीटकनाशक?

लक्षात ठेवा या गोष्टी

निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे तुम्ही ऑनलाइन नाव नोंदणी करू शकता. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मका खरेदी केंद्रावर आणण्यासाठी नंबरनुसार एसएमएसद्वारे कळविले जाईल. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी बारामती बाजार समितीचे यांत्रिक चाळणी येथील खरेदी केंद्रावर मका स्वच्छ वाळवून आणावी.

Success story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! YouTube च्या मदतीने वाळवंटात केली गुलाबी पेरुची बाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *