Sugar Prices । ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकरी गळीत हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होईल अशी चर्चा सुरु आहे, परंतु अजूनही गळीत हंगामाची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. पावसामुळे यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवर (Sugar prices rising) होणार आहे. अशातच आता सर्वसामान्यांना फटका बसला आहे.
Kiwi Fruit । शेतकऱ्यांनो.. बक्कळ पैसा कमवायचा असेल तर करा किवी फळाची शेती, अशी करा लागवड
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशावर खूप आर्थिक ताण येत आहे. अशातच आता साखरेच्या किमती वाढल्या (Sugar Prices Hike) आहेत. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमतीनी मागील 13 वर्षातील सर्वोच्च दर गाठला आहे.
भारत आणि थायलंडमधील ऊस पिकांवर एल निनोमुळे परिणाम झाला आहे, असे संघटनेचे मत आहे. त्याचा साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. मागील महिन्यात अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात F&O साखर किंमत निर्देशांक 9.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता हा निर्देशांक नोव्हेंबर 2010 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून सलग दुसऱ्या महिन्यात साखरेची वाढ झाली आहे.