Pesticide Ban

Pesticide Ban । सर्वात मोठी बातमी! सरकारने घातली ‘या’ चार कीटकनाशकांवर बंदी; लगेचच पाहा कोणते ते कीटकनाशक?

बातम्या

Pesticide Ban । हल्ली शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर करतात. त्यामुळे जमीनचा दर्जा कमी होतोच शिवाय त्यातून निघणारे उत्पन्नही आरोग्यासाठी चांगले नसते. मोजकेच शेतकरी सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) वापर करतात. जर तुम्हीही रासायनिक खतांचा वापर करत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता सरकारने चार नोंदणीकृत कीटकनाशकांचा वापर, विक्री आणि वितरणास मनाई केली आहे.

Success story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! YouTube च्या मदतीने वाळवंटात केली गुलाबी पेरुची बाग

यामध्ये तीन कीटकनाशक आणि एका बुरशीनाशकाचा (Pesticide Ban In India) समावेश आहे. इतकेच नाही तर सात कीटकनाशकांच्या लेबल क्लेममधून काही पिके वगळली आहेत. ३ ऑक्टोबर २०२३ पासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मानवी आरोग्य, मित्रकीटक, प्राणी, पर्यावरण, माती, पाणी आणि इतर अलक्ष्यित सजीवांना निर्माण होणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे, IMDने जारी केला अलर्ट

या कीटकनाशकांवर घातली बंदी

डायकोफॉल, मिथोमील, डिनोकॅप आणि मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २०२३ मध्ये कीटकनाशक कायदा १९६८ मधील कलमांच्या अधिकारांनुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने चार कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२३ मध्ये तो सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध केला. त्यास कीटकनाशक मनाई अधिसूचना, २०२३ असे संबोधण्यात आले आहे.

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

लेबल क्लेममधून वगळण्यात आलेली पिके

  • कार्बोफ्युरॉन- कीटकनाशक – ‘तीन टक्के इनकॅप्सुलेटेड ग्रॅन्यूल या फॉर्म्यूलेशन शिवाय सर्व पिकांत लेबल क्लेममुसार वापर थांबविला.
  • मॅलॅथिऑन- कीटकनाशक – वापरापासून वगळलेली पिके- ज्वारी, सोयाबीन, एरंडी, भेंडी, वांगे, सूर्यफूल, तसेच कॉलिफ्लॉवर, मुळा, टर्निप, आंबा द्राक्षे, टोमॅटो, सफरचंद
  • मॅन्कोझेब- पेरू, साबुदाणा आणि ज्वारी
  • क्विनॉलफॉस- ताग (ज्यूट), ज्वारी, वेलची
  • ऑक्सिफ्लोरफेन- बटाटा आणि भुईमूग
  • क्लोरपायरिफॉस- बोर, लिंबू आणि तंबाखू
  • डायमिथोएट- जी फळे आणि भाजीपाला कच्च्या स्वरूपात खाल्ली जातात, त्यांना वगळले आहे.

Onion Rate । आज कुठल्या मार्केटमध्ये कांद्याने खाल्ला भाव; जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *