Ritha Farming

Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न

बातम्या

Ritha Farming । हल्ली शेती करणे खूप जिकरीचे काम झाले आहे. कारण दरवर्षी शेतमालाला (Vegetables price) चांगला हमीभाव मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. पण आता तुम्हीही शेतीमधून लाखो रुपयांचं उत्पादन मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला एका झाडाची लागवड करावी लागेल. त्याच्या माध्यमातून तुम्ही एकरात 10 लाखांचं उत्पन्न मिळवू शकता.

Cotton Rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी

करा रिठा झाडांची लागवड

तुम्ही रिठा झाडांची लागवड (Cultivation of Ritha Trees)करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवू शकता. रिठा झाडाचे नाव Sapindus mucorossi असे असून रीठाचा उपयोग (Ritha uses) साबण आणि शॅम्पू सारखी सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी करण्यात येतो. विविध औषधे तयार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. रीठा (Ritha) ही एक उपयुक्त वनस्पती असून तिची पंधराशे मीटर उंचीवर वाढ होते.

Havaman Adnaj । ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

रिठाची रोपवाटिका तयार केल्यानंतर रिठाची लागवड (Cultivation of Ritha) केली जाते. या झाडाची एकदा वाढ झाली की त्याला सिंचनाची गरज पडत नाही. हे पीक तुम्ही कोणत्याही प्रकारच्या उपयुक्त जमिनीवर घेऊ शकता. या झाडाच्या फळे आणि बियांचा वापर केला जातो. औषधी गुणधर्म असल्याने या वनस्पतीची लागवड करून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता.

Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर

शेतकऱ्यांना आता फलोत्पादन विभागाचे फार्मास्युटिकल युनिट रिठाच्या लागवडीसाठी तांत्रिक माहिती आणि कृषी प्रशिक्षण देखील देत आहे. रिठाचा उपयोग साबण आणि शॅम्पू सारखी सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी करण्यात येतो. विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी रिठाचा वापर करण्यात येतो. विशेष म्हणजे लागवडीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पन्नास हजार रुपये,अजित पवार यांची मोठी घोषणा

किती होते कमाई?

बाजारभाव योग्यरित्या उपलब्ध असेल तर तुम्हाला याचा चांगला फायदा मिळू शकतो. एक झाड चार वर्षांत तयार होते. तुम्ही एका एकरात 100 रिठाची झाडे लावली तर एका झाडापासून 100 किलोपर्यंत रिठा तयार होतो. किमतीचा विचार केला तर एक किलो रिठा 100 रुपये किलो दराने विक्री होतो. तुम्ही एका एकरातून तब्बल 10 लाख रुपयांची कमाई सहज करू शकता.

Onion Rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *