Potato Price । सर्वच स्वयंपाक घरात बटाट्याचा (Potato) वापर केला जातो. बटाट्यापासून विविध भाज्या बनवण्यात येतात. प्रत्येक हंगामात बटाट्याची लागवड करण्यात येते. मागणी जास्त असल्याने बटाट्याला चांगले दरही (Potato rate) मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्याचे दर खूप वाढतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप होतो. पश्चिम उत्तर प्रदेशात बटाट्याची खूप लागवड (Potato cultivation) केली जाते.
Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न
खरंतर बाजारात बटाट्याची किंमत त्याच्या आकारमानावर आणि प्रकारावर ठरवली जाते. त्यामुळे बाजारात विविध दराचे (Potato rate in market) बटाटे उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. बटाट्याची किंमत 10 रुपये प्रति किलो ते 40 रुपये प्रतिकिलो अशी असते. पण तुम्हाला अमेरिकेत उपलब्ध असणाऱ्या बटाट्याची किंमत किती आहे माहिती आहे आहे का?
Cotton Rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी
किती आहे अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत?
अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित. (Potato Price in America) अहवालानुसार, अमेरिकेत एक किलो बटाट्याची किंमत 3.01 डॉलर्स म्हणजे सुमारे 250 रुपये प्रति किलो इतकी आहे. आपल्याकडे किरकोळ बाजारात बटाट्याची किंमत ही 20 ते 25 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. अंदाजे वर्षभर जास्तीत जास्त 30 ते 50 रुपये या दराने बटाट्याची विक्री होते.
Havaman Adnaj । ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
बाजारात लाल, पांढरा, पिवळा आणि जांभळ्या रंगाचे बटाटे उप्लब्ध आहे. प्रत्येक प्रकारच्या बटाट्याच्या किंमत वेगळी असून अहवालानुसार, लाल बटाटे सर्वात स्वस्त आहे तर जांभळे बटाटे सर्वात महाग आहे. वास्तविक भारतातील देशी बटाट्यांना परदेशात विशेष मागणी असून भारतीय बटाटे इंडोनेशिया, श्रीलंका, ओमान, मलेशिया, मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये निर्यात करतात.
Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर
बटाटा उत्पादनात आघाडीवर असणारी राज्य
उत्पादनाचा विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये 29.65 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 23.51 टक्के, बिहारमध्ये 17.2 टक्के, गुजरातमध्ये 7.05 टक्के आणि मध्य प्रदेशात 6.68 टक्के आणि पंजाबमध्ये 5.32 टक्के बटाट्याचे उत्पादन होते.