Havaman adnaj

Havaman adnaj । ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

हवामान

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने हजेरी (Rain in Maharashtra) लावली आहे.

Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर

विदर्भामध्ये वादळी पावसाचा अंदाज

फेब्रुवारी महिना निम्मा संपत आला तरीही राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता (IMD Alert) असून 11 फेब्रुवारीपासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता वर्तवली आहे. मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॅामीक सर्क्यूलेशनमुळे (Cyclic circulation) विदर्भामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पन्नास हजार रुपये,अजित पवार यांची मोठी घोषणा

हवामान खात्याने दिला इशारा

हवामान खात्याकडून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देखील हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

Onion Rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर

रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जर आता अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली तर शेतकऱ्यांना आणखी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. राज्यातील काही भागात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. नवीन वर्षाची सुरुवात देखील पावसाने झाली आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Farmers Help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत

यंदा पावसाचा खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कमी पावसाचा परिणाम म्हणून रब्बी हंगामात लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आणि ज्या भागात रब्बी हंगामात पीक पेरणी बऱ्यापैकी झाली आहे, तिथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे खूप नुकसान होत आहे. निसर्गाच्या लहरीपणासमोर शेतकरी हतबल झाले आहेत.

Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *