Farmers help

Farmers help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत

बातम्या

Farmers help । सर्वचजण सोशल मीडियाचा (Social media) वापर करतात. सोशल मीडियामुळे संपूर्ण जग मुठीत आले आहे. अनेक कामे चुटकीसरशी होत आहेत. अशातच आता याच सोशल मीडियाच्या मदतीने एका शेतकऱ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेळातच 80 हजार रुपयांची नवीन बैलजोडी (Pair of oxen) शेतकऱ्याला विकत घेऊन देण्यात आल्याची घटना घडली आहे.

Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर

दोनवेळा बैलजोडी चोरीला

रामचंद्र गव्हाणे (Ramachandra Gavane) असे मदत मिळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नांदेड तालुक्यातील कलदगाव येथील रहिवासी आहेत. अल्पभूधारक असल्याने ते बैलजोडीच्या माध्यमातून ते उदरनिर्वाह करतात. बैलजोडीच्या माध्यमातून ते इतरांच्या शेतात जाऊन नांगरणी, वखरणीसह शेतीची अनेक कामे करतात. पण त्यांची बैल जोडी सहा महिन्यापूर्वी चोरीला गेली. त्यानंतर त्यांनी उसनवारी करून त्यांनी बैलजोडी घेतली पण दुसरीही बैलजोडी पून्हा चोरीला गेली.

Havaman Adnaj । शेतकऱ्यांनो सावधान! पुढचे ३ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

सोशल मीडियावर केली मदत

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीही त्यांची तक्रार घेतली नाही. दोनवेळा बैल चोरीला गेल्याने हे कुटुंब खचून गेले होते. पण त्यांच्या मदतीला संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे पाटील धावून आले. त्यांनी या शेतकऱ्याला धीर देऊन फेसबुक, व्हाट्सएप या सोशल मिडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याची हकीकत मांडत मदतीचे आवाहन केले.

Success Story । इंजिनीअरिंगच्या नोकरीला ठोकला रामराम! टोमॅटोच्या शेतीतून ‘हा’ पठ्ठया मिळवतोय लाखोंचा नफा

अवघ्या काही तासातच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली. या शेतकऱ्याला चक्क 80 हजार रुपयांची मदत झाली. त्यातून त्यांनी बैलजोडी खरेदी केली. सोशल मीडियावर मिळालेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. या शेतकऱ्याने त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत.

Maize Crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या

“दोनवेळा बैलजोडी चोरी गेल्यानंतर मी पूर्णतः खचून गेलो होतो. बैलजोडी पुन्हा घेणे शक्यच नव्हते. माझा सर्व उदरनिर्वाह यावर अवलंबून असल्यामुळे मी प्रचंड मानसिक त्रासात होतो. आमच्या गावातील संतोष गव्हाणे मला देव म्हणून धावून आले. मदतीसाठी धावून येणाऱ्या मंडळींचे आभार मानावे तितके कमी आहे,” अशी प्रतिक्रिया रामचंद्र गव्हाणे यांनी दिली आहे.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *