Agriculture electricity

Agriculture electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी दिवसा मिळणार 12 तास वीज, फडणवीसांनी दिलं आश्वासन

बातम्या

Agriculture electricity । राज्याला सतत विजेच्या संकटाचा (Power crisis) सामना करावा लागतो. वीज उपलब्ध नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. यामुळे पिके संकटात येतात. अनेकदा तर डीपी (DP) जळालेली असते. वारंवार तक्रार करूनही डीपी लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी (Farmers) हतबल होतात. परंतु, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

12 तास मिळणार वीज

शेतकऱ्यांना आता शेतीसाठी दिवसा 12 तास वीज (Electricity) मिळणार आहे. “आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार आहोत. पुढील वर्षात सगळ्या शेतकऱ्याना 12 तास दिवसा वीज (12 hour day electricity) देणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. याचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. परंतु, आता सरकार (Government) दिलेलं आश्वासन पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

बीड जिल्ह्यातील परळीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आपण वीज सोलरवर वीज करत आहोत. त्यामुळं आता 365 दिवस आपण शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

25 टक्के अग्रीम जमा

“यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. यावर्षी आपण शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. एक रुपयात पिक विमा योजनेला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात 18 लाख शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम जमा झाला आहे. सोयाबीन आणि कापसाचा भाव वाढला पाहिजे. संकटात अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करेल,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

पुढे ते म्हणाले, “शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला धैर्य यावं, तसेच त्याच्या शेतमालाला दर मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकार लवकरच सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक करणार आहे. आमच्या शेतमालाला चांगला दर मिळावा, हीच आमची मागणी आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *