Supriya Sule । यावर्षी पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
Havaman Andaj । चक्रीवादळामुळे शेतकरी अडचणीत! ‘या’ ठिकाणी पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस
मुसळधार पावसाने शेतीचे खूप मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. संसदेच्या (Parliaments) हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी (Loan waiver) करा, अशी मागणी केली आहे. (Farmer loan waiver)
Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा
“महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून काही जिल्ह्यात ओला दुष्काळ पडला आहे, तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे, यंदा वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, ” असे सुळे म्हणाल्या आहेत.
Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..
“त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची गरज असून बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी शेतकरी मदतीला धावून येतो. केंद्रीय पथकाने देखील तातडीने महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी.त्यामुळे आता महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावी,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या