Ravikant Tupkar । भारतात जरी मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जात असली तरी प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळतोच असे नाही. यावर्षीदेखील शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी सध्या सरकारवर (Government) नाराज झाले आहेत. त्यापाठोपाठ शेतकरी संघटना (Farmers Association) देखील आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी हमीभावासाठी आंदोलन केले होत. (Ravikant Tupkar Latest News)
Dense Fog । सावधान! देशातील अनेक राज्यांमध्ये आज धुके पडणार, या ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज
रविकांत तुपकर यांचं बुलढाण्यात सलग ५ दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा खूप खालावली होती. रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील परंतु, मी आंदोलनावर ठाम आहे, शेतकऱ्यांना राज्य सरकारने (State Govt) दिलेला शब्द पाळावा, नाहीतर १५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस आंदोलनाचा (Soybean-Cotton Movement) स्फोट होईल, असा आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
डिस्चार्ज मिळताच तुपकर बुलढाण्यात
राज्य सरकारने आपल्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. उरलेल्या मागण्यांसाठी आम्ही सरकारला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. उपोषणानंतर तुपकर यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच गुरुवारी रात्री रविकांत तुपकर पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यात आले.
Tomato Rate । अमेरिकेत ‘या’ दराने विकला जातोय टोमॅटो, भाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
सर्वात अगोदर त्यांनी सोयाबीन-कापूस आंदोलनाचे केंद्रबिंदू असणाऱ्या सोमठाणा गावकऱ्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुंबई बैठकीत झालेली सविस्तर माहिती संपूर्ण गावकऱ्यांना दिली. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून अंमलबजावणीसाठी सरकारला १५ दिवसाचा वेळ दिला असल्याचेही रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.
एल्गार मोर्च्याचे आयोजन
दरम्यान, राज्यात आणि विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून ओळख असणाऱ्या कापूस आणि सोयाबीन पिकाला चांगला हमीभाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच त्यांनी बुलढण्यात कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विविध मागणीसाठी 20 नोव्हेंबरला भव्य शेतकरी एल्गार मोर्च्याचे आयोजन देखील केले होते.
Nandurbar News । हृदयद्रावक! पोटासाठी अपंग भावांचा संघर्ष, तोंडात कोयता धरून करताहेत ऊस तोडणी