Crop Insurance । अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, कीटक आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांना शेती करताना कायमच सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. हातातोंडाशी आलेली पिके नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होत असतात. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभा राहते.
नुकसानी पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार पिक विमा योजना राबवते. या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांनी विमा काढला तर त्यांचे नुकसान भरपाईच्या माध्यमातून भरून काढले जाते. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ४९ लाख ५ हजार ०३२ शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा (Crop Insurance) म्हणून मंजूर झाले आहेत.
या रकमेपैकी बुलढाणा जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकऱ्यांना १८ कोटी ३९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे. यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यांनी मदतीची मागणी सरकारकडे केली होती यानंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला.
Nandurbar News । हृदयद्रावक! पोटासाठी अपंग भावांचा संघर्ष, तोंडात कोयता धरून करताहेत ऊस तोडणी
यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. आणि सध्या ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या रकमेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच आंदोलन पुकारत असतात. त्यांनी शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा रकमेचे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी देखील राजव्यापी एल्लागार आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या आता सरकारने देखील या मागणीला मान देत शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीमी पीक विमा रकमेची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.