Havaman Andaj

Havaman Andaj । ब्रेकिंग! मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, येत्या 48 तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता; या ठिकाणी अलर्ट

हवामान

Havaman Andaj । सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे मात्र. हिवाळ्यात देखील पाऊस पडत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा तडाखा दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Onion Rate । बारामती, लासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसण्याचा अंदाज आहे. येत्या 48 तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या विदर्भासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

Nandurbar News । हृदयद्रावक! पोटासाठी अपंग भावांचा संघर्ष, तोंडात कोयता धरून करताहेत ऊस तोडणी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Cotton Rate । पंजाबपेक्षा महाराष्ट्रात कापसाला मिळतोय सर्वाधिक दर, आगामी काळात अजून दर वाढण्याची शक्यता

देशातील हवामानाबद्दल पाहायचं झालं तर, मिचाँग चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये छत्तीसगड, झारखंड, दक्षिण बिहार, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल मध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Mangoor Fish Farming । बिग ब्रेकिंग! मांगूर मत्स्यपालनावर होणार कडक कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

त्याचबरोबर मीझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तमिळनाडू, केरळ, मराठवाडा, कर्नाटक पूर्व उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ते पिकाची काळजी घ्यावी असे आव्हान वेळोवेळी कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Milk Business । तुम्हालाही मिळवायचा असेल दूध व्यवसायात नफा तर खरेदी करा ‘या’ मशिन्स, वाचा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *