Havaman Andaj

Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट

Blog हवामान

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या (Rain update) काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rain update in Maharashtra)

LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

जानेवारी महिन्यात संपूर्ण देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडते. परंतु, यंदा मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात होऊनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा (Heavy rain update) धोका बसणार असल्याचे सांगतिले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. (IMD Alert)

Farmer strike । शेतकरी करणार 26 जानेवारीला देशभरात मोर्चा, नेमकं कारण काय?

या ठिकाणी कोसळणार पाऊस

तापमानामध्ये घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात पावसाचा अंदाज आहे. धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येथे येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे.

Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या

तसेच उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये पुढील ३-५ दिवसांत गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

Alu Cultivation । शेतकरी मित्रांनो अळूची लागवड करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत; जाणून घ्या लागवडीबद्दल कृषी तज्ञांची मोठी माहिती

थंडीचा कडाका वाढणार

इतकेच नाही तर कोकण, गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पूर्व गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. पंजाब, उत्तर हरियाणाचा काही भाग आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एक किंवा दोन ठिकाणी खूप दाट धुके पडतील. येत्या काही दिवसात येथे थंडीचाही कडाका वाढू शकतो.

Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *