Farmer strike । शेतकऱ्यांना सध्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहेत. कारण दुधाचे घसरलेले दर, भाजीपाला दर कमी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. शिवाय सरकारने कांद्यावर निर्यातबंदी (Export ban on onion) घातली आहे. शेतकरी सगळीकडून संकटात सापडला आहे. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वादळ दिल्लीत धडकणार आहे.
काय आहेत मागण्या?
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संयुक्त किसान मोर्चाकडून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आगामी तीन महिन्यांत देशभरात महापंचायत आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. (Farmers march) फेब्रुवारी 2024 मध्ये दिल्लीला जाण्याचे ठरले. (Sanyukt Kisan Morcha) युनायटेड किसान मोर्चाच्या मतानुसार, शेतकऱ्यांच्या आठ प्रमुख मागण्या असून ज्यात एमएसपीवर पिकांच्या खरेदीची हमी देणारा कायदा, कर्जमाफी, विजेचे खाजगीकरण थांबवणे आणि 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन देणे यांचा समावेश आहे.
Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा आणि 18 शेतकरी संघटनांनी शनिवारी बर्नाळा येथे महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीत शेतकरी नेत्यांनी पिकांना किमान आधारभूत हमी देणारा कायदा करावा (MSP) आणि स्वामिनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याची मागणी केली असून संपूर्ण उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय राजधानीकडे ‘दिल्ली चलो’ मोर्चाची घोषणाही केली आहे.
संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनांच्या वतीनं 26 जानेवारीला देशभरात मोर्चा काढणार आहे. केंद्र सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहे. या सरकारनं अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. आतातरी सरकार याकडे लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये