Success Story

Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये

यशोगाथा

Success Story । शेतकरी आता पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. तरुण वर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले असून ते देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. शेतकरी अनेक अडचणींवर मात करत शेतीत चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Farmer Success Story)

Soybean rates । सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त, हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन केले आंदोलन

घेतला सरकारी योजनेचा लाभ

उमरी येथील एका शेतकऱ्याने एक एकर काकडीतून (Cucumber cultivation) दोन लाख रुपये कमावले आहेत. विशेष बाब म्हणजे अवघ्या तीन महिन्यात त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. (Cucumber price) त्यांच्या या यशामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. अनेकजण त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे. त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. ज्याचा त्यांना लाभ झाला.

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

काकडीतुन केली कमाई

सचिन गळगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते डॉक्टर आहे. डॉक्टर असूनही शेती केल्याने अनेकांना आश्चर्य निर्माण झाले आहे. त्यांनी सुरुवातीला काकडीचे पीक घेतले. तीन महिन्यात अपेक्षित कमाई त्यांना करता आली. काकडीचा हंगाम संपल्यानंतर लगेच या नेट शेडमध्ये दोडका आणि कारले हे भाजीपाला फळपीक लागवड केली. त्यातून त्यांना अडीच ते तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे.

CIBIL Score । शेतकऱ्यांना सुध्दा कर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा असतो? जाणून घ्या नियम

त्यांनी नानाजी देशमुख पोखरा योजनेअंतर्गत (Government Schemes) नेटशेडची बांधणी केली आहे. त्यांना या योजनेअंतर्गत जवळपास नेट- रोडसाठी २१ लाखांचा खर्च आला असून त्यासाठी अगोदर सर्व खर्च वैयक्तिक केला.त्यानंतर शासनातर्फे ८० टक्के म्हणजेच १८ लाख रुपयांची सबसिडी मिळाली. त्यांच्या शेतामध्ये अगोदरच विहीर आणि बोअरची सिंचनासाठी व्यवस्था होती.

Success Story । सेंद्रिय गुळाच्या माध्यमातून यशाला गवसणी! तरुण शेतकरी वर्षाला करतोय 8 ते 9 लाखांची कमाई

सध्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे खूप अस्वस्थ आहेत. ते विविध संकटामुळे आर्थिक नैराश्यात सापडले आहे. अशा वेळी त्यांच्यासमोर कोणताच पर्याय दिसत नाही. त्यामुळे नैराश्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. पण काही शेतकरी असे आहेत जे हार न मानता अपार कष्ट करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *