Apple job । मानलं रे भाऊ तुला..! आई-वडिलांसाठी सोडली परदेशातील 72 लाखांची नोकरी, आता करतोय शेती

यशोगाथा

Apple job । आज असेही काही जण आहेत ते लाखो रुपयांचा पगार घेतात. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना करोडो रुपयांचे पॅकेज देतात. तर काही दिग्गज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एका व्यक्तीने 72 लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारली आहे. विदेशातील गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून तो आता शेती करत आहे.

LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर

मनीष शर्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने ही नोकरी आपल्या आई-वडिलांसाठी सोडली आहे. त्यांना ब्रिटनमध्ये अॅपल (Apple) कंपनीत 72 लाखांचा पगार मिळत होता. परंतु त्यांना त्यांच्या आई-वडिलांसोबत राहायचे होते. परंतु ब्रिटीश सरकार त्यांना परवानगी देत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून सेंद्रिय शेती (Organic farming) करण्याचा निर्णय घेतला. मनीष शर्मा राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात राहतात.

Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन

सेंद्रिय शेतीतुन कमावताहेत लाखोंचे उत्पन्न

मनीष शर्मा यांनी ब्रिटनमधून भारतात आल्यानंतर आपल्या गावात त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. इतकेच नाही तर ते इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी याचे प्रशिक्षण देत आहे. दीड वर्षांपेक्षा जास्त दिवस ते शेती करत आहेत. मनीष शर्मा यांनी नागौरच्या सेठ किशनलाल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एमडीएचएसमधून बीबीए केले.

Subsidy For Poultry । आनंदाची बातमी! 25 लाखांचे अनुदान घेऊन करा लेयर कुक्कुटपालन, असा करा अर्ज

त्यानंतर त्यांनी 3 वर्षे CAS करून कार्डिफ विद्यापीठ UK मधून IBM, MSC, MBA आणि PHD चे शिक्षण पूर्ण केले. यांनतर त्यांना ब्रिटनमधील अॅपल कंपनीत नोकरी मिळाली. कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. परंतु शर्मा यांनी आईवडिलांची सेवा करण्यासाठी नोकरी गमावली.

Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी

घेतले या पिकांचे उत्पादन

मनीष शर्मा हे सध्या जिरे, बाजरी, कापूस, रब्बी आणि गहू यासह वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असून ते 40 प्रकारच्या भाज्या पिकवत आहे. मागील दीड वर्षात त्यांना सेंद्रिय शेतीतुन 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Havaman Andaj । सावधान! पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *