LPG Cylinder New Price

LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर

बातम्या

LPG Cylinder New Price। नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसापासून महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. एकीकडे वाढत चाललेली महागाई तर दुसरीकडे कमी उत्पन्नामुळे सर्वसामान्यांची दुहेरी कोंडी होत आहे. महागाईपासून दिलासा कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता एक दिलासा देणारी बातमी आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन

केंद्राने एलपीजीवरील अनुदानात (Subsidy on LPG) वाढ केली असून उज्जवला योजनेतील (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना आता 200 ऐवजी 300 रुपयांचे अनुदान (LPG Subsidy) मिळेल. केंद्राने यापूर्वी रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने 200 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कमी किमतीत गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder Price) मिळणार आहे.

Subsidy For Poultry । आनंदाची बातमी! 25 लाखांचे अनुदान घेऊन करा लेयर कुक्कुटपालन, असा करा अर्ज

याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर माहिती दिली आहे. बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. यापूर्वी एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केल्याने ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली (LPG Gas Cylinder Price Cut) आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान मिळेल. याचाच असा अर्थ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळेल.”

Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी

असे आहेत दर

सध्या दिल्लीमध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना 14.2 किलो एलपीजी सिलिंडरसाठी 703 रुपये मोजावे लागतात, तर बाजारात सामान्य नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 903 रुपये मोजावे लागतात. परंतु आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यांना 603 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे त्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Havaman Andaj । सावधान! पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *