Subsidy For Poultry

Subsidy For Poultry । आनंदाची बातमी! 25 लाखांचे अनुदान घेऊन करा लेयर कुक्कुटपालन, असा करा अर्ज

शासकीय योजना

Subsidy For Poultry । राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (National Livestock Campaigns) २०२१-२२ पासून उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना केली आहे. प्रती पशुची उत्पादकता वाढवणे, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, एका छत्राखाली मांस, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, अंडी उत्पादन वाढविणे, बकरीचे दूध आणि लोकर हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी

तुम्हाला आता कुक्कुटपालन, शेळी, मेंढी आणि वराह पालनातून प्रजाती विकासाच्या माध्यमातून उद्योजकता विकास, पशुखाद्य आणि वैरण उद्योजकता विकासासाठी या अभियानाअंतर्गत अर्ज करता येईल. आनंदाची बाब म्हणजे या अभियानाच्या माध्यमातून कुक्कुटपालनांत १००० अंड्यांवरील म्हणजे पक्षांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त 50 लाख पर्यंत अनुदान (Poultry Subsidy ) दिले जाते. तुम्ही अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशूधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. (Application for PoultrySubsidy)

Havaman Andaj । सावधान! पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

या आहेत अंमलबजावणी यंत्रणा

पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य पात्र संस्था-व्यक्तीगत/FPO/FCOs/SHG/JLG/कलम ८ अंतर्गत नोंदणी असणाऱ्या कंपन्या.

Havaman Andaj । मान्सून परतीच्या प्रवासाला लागला? पाहा पुढील 48 तासांसाठीचा हवामान अंदाज

योजनेची वैशिष्ट्ये

 • अर्जदार व्यक्तीला nlm.udyamimitra.in या पोर्टलवर अर्ज करावा लागेल.
 • त्यानंतर राज्य अंमलबजावणी यंत्रणा सादर झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र अर्जांना ऑनलाईन पद्धतीने मंजुरी दिली जाते.
 • अर्ज बँकेकडे मंजुरीसाठी सादर केला जातो.
 • बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याची हमी देऊन प्रकल्प राज्यस्तरीय कार्यकारी समिती समोर मंजुरीसाठी सादर केला जातो.
 • त्यानंतर या प्रकल्पांना राज्यस्तरीय कार्यकारी समितीच्या माध्यमातून मंजुरीसाठी शिफारस मिळाल्यानंतर स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सी या प्रस्तावाचे शिफारस पत्र ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करून प्रकल्प मंजुरीसाठी सरकारकडे पाठवते.
 • केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची मंजुरी समिती राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रकल्पांना मंजुरी देऊन अनुदानाची रक्कम भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या कर्ज मंजुरी देणारी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे पाठवते.

Rose Farming । गुलाब लागवडीचा योग्य काळ कोणता? कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? जाणून घ्या माहिती

अटी

१. अर्जदार स्वत: किंवा त्यांच्याकडील तज्ञ प्रकल्पाशी निगडित प्रशिक्षित आणि अनुभव गरजेचा आहे.
२. अर्जदाराचे ज्या बँकेत खाते आहे त्या शेड्युल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र गरजेचे आहे.
३. प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्वावरची जमीन, KYC साठी आवश्यक कागदपत्रे गरजेची आहेत.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! पारंपारिक शेती सोडून सुरु केली अत्तराची शेती; जाणून घ्या कस केलं नियोजन?

महत्त्वाची कागदपत्रे

 • जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) ७/१२
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • सविस्तर प्रकल्प प्रस्ताव
 • अनुभव प्रमाणपत्र
 • प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
 • स्वतःचे भांडवल/बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा
 • वास्तव्य पुरावा
 • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • पॅनकार्ड
 • कॅन्सल बँक चेक
 • आधार कार्ड
 • जात प्रमाणपत्र
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • अर्जदाराचा फोटो
 • भागीदारी करार
 • वस्तु व सेवाकर नोंदणी प्रमणपत्र (लागु असल्यास)
 • मागील ३ वर्षाचा आयकर विवरणपत्र (लागु असल्यास)
 • मागील ३ वर्षाचा ऑडीट रिपोर्ट (लागु असल्यास)
 • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO, FCO, Sec.8 कंपनीकरीता)

Eknath Shinde । ब्रेकिंग न्यूज! कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *