Rose Farming । अलीकडच्या काळातील शेतकरी शेतीमध्ये वेगेवेगळे प्रयोग करून जास्त नफा घेत आहेत. त्याचबरोबर शेतकरी फळशेती आणि फुलशेती जास्त प्रमाणात करत असल्याचे दिसत आहे. फुलशेतीमध्ये शेतकरी गुलाब लागवडीस प्राधान्य देतात. त्याच कारण असं की गुलाबाचा वापर अनेक कार्यक्रमांमध्ये केला जातो त्यामुळे गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे याची लागवड केल्यास चांगला नफा मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी गुलाबशेतीची लागवड करतात आणि लाखो रुपये कमवतात. चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती. (Rose Farming)
Cabinet meeting । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!
गुलाब शेती करताना मातीची निवड करणे खूप महत्वाचे मानले जाते. कारण जर योग्य मातीची निवड केली तर त्यामधून चांगले उत्पन्न निघते. त्यामुळे ५० ते ६० से. मी. खोलीची, पाण्याचा निचरा होणारी, सामू ५.५ ते ६.० असलेली जमीन निवडावी. याची लागवड करण्याआधी जमिनीची पूर्व मशागत करणे गरजेचे आहे. यासाठी शेणखत मिसळून ९० से. मी. रुंदीचे ३० ते ४५ से. मी. उंचीचे गादीवाफे ३ टक्के फॉर्मलडीहाईड या द्रावणाने निर्जंतूक करावेत. असे केल्यास चांगले उत्पन्न येईल.
गुलाबाचे सुधारित वाण कोणते?
१) फर्स्ट रेड
२) नोबलीस
३) स्काय लाईन
४) बियांका
५) टेमटेशन
६) पॅशन
७) गोल्डन स्ट्राईक
८) बोर्डी
९) सुपर स्टार
Maharstra Rain । मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मोठं मोठी झाडे कोसळली
जुलै ते दरम्यान याची लागवड केली जाते. यामध्ये काही खाते वापरणे देखील गरजेचे असते. ३५ ते १० किलो शेणखत, ३०:३०:२० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश / चौ. मी. लागवडीच्या वेळी त्यानंतर ४०० २०० २०० मिलीग्रॅम नत्र, स्फुरद पालाश प्रति झाड प्रति आठवडा द्यावे. असे केल्यास तुमची गुलाब शेती चांगली बहरेल आणि तुम्हाला यामधून चांगला नफा मिळेल.