Maharstra Rain । मागच्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काल देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा अधिक प्रादुर्भाव वाढला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे
वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. मोठमोठी झाडे अनेक ठिकाणी पडली आहेत. हवामान विभागाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाने ही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यालगत पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मागच्या दोन दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडलेले आहेत.
माहितीनुसार, दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांना तर पावसाने चांगले झोडपून काढले आहे. बांदा परिसरामध्ये देखील वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी झाडे कोसळणे, घरांचे छत उडून जाणे, विजेचे खांब पडणे अशा अनेक घटना घडल्या आहेत.
शेतकरी संकटात
सध्या अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन हे पीक काढण्यासाठी आले आहेत. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही पिकांवर रोग पडला आहे तर काही पीक पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करून दिलासा द्यावा अशी देखील मागणी आता जोर धरू लागली आहे.