Shednet home planting । शेडनेटगृह हे सावलीसाठी नेट (जाळी) ह्या प्रकारच्या आच्छादनाने झाकलेला सांगाडा फ्रेम असलेले घर असून ते जी. आय पाईप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकाच्या प्लास्टीकच्या जाळीने (शेडनेटस) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यु. व्ही. संस्कारीत अशा १०० टक्के पॉलीईबिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या असतात. या शेडनेटच्या सहाय्याने दिवसा पिकासाठी प्रकाशाची तीव्रता व प्रभावी उष्णता कमी करता येत असल्याने बऱ्याच अंशी वातावरणावर नियंत्रण करता येते. यामुळे हरितगृहाप्रमाणे शेडनेटगृहाचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व काही फुलपिकांसाठी उपयुक्त अशी वातावरण निर्मिती करून चांगल्या प्रतीचे जास्त उत्पादन मिळविण्यासाठी करता येतो. शेडनेटगृहात वातावरणातील तापमान, अर्द्धता, कर्बवायु, वारा इत्यादी घटकावर बन्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येत असल्याने शेडनेटगृहातील पीक लागवड ही उघड्या शेतातील पीक लागवडीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे
शेडनेटगृहात पावसाळा सोडून इतर हंगामात पीके घेता येतात. ज्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त असते अशावेळेस पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त तापमानात तग धरणे कठीण होते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धताही कमी असते. कमी पाण्यात व अती तापमानात पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतात व उत्पादनात लक्षणीय घट आल्याने उत्पन्न कमी मिळते. अशा स्थितीत पिकांना शेडनेटच्या सहाय्याने सावली केली तर वातावरणातील तापमान तर कमी होतेच शिवाय पिकांची पाण्याची गरज सुध्दा कमी होते व त्यामुळे पीक लागवड यशस्वी होते… पिकांसाठी शेडनेटगृहाचे क्षेत्र ५ पासुन १ एकरपर्यंत असू शकते.
शेडनेटगृह लागवडीचे फायदे
१. बाजारपेठेतील मागणीप्रमाणे पिकाची लागवड करता येते.
२. भाजीपाला पिकाशिवाय शोभिवंत लहान झाडे, फुलझाडे, फळभाज्या, औषधी व सुगंधी वनस्पती, मसाला पिके व नर्सरी
रोपे (भाजीपाला व फळझाडे) यांची यशस्वीपणे लागवड करता येते.
३. पिकाचे अति व कमी तापमान, वारा, गारठा, पक्षी व किटक यांच्यापासून संरक्षण होते.
४. पिकास जास्त आर्द्रता आवश्यक असल्यास फॉगर्सच्या सहाय्याने निर्माण करता येते.
५. शेडनेटगृहाने विशेषतः उन्हाळ्यात पिकाचे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्ता यांच्या मात्रेत लक्षणीय सुधारणा होते. चांगल्या गुणवत्तेमुळे चांगला बाजारभाव मिळतो.
६. लागवडीस अयोग्य व खडकाळ जमिनीवर शेडनेटगृह उभारून चांगले उत्पादन मिळविता येते.
७. उन्हाळ्यात पिकांची उगवण टक्केवारी वाढते.
Banana Crop Insurance । केळी विमा प्रश्न तापला; आंदोलन होणार…
शेडनेटचे प्रकार : शेडनेटगृहाचे छताच्या आकारानुसार साधारणपणे खालीलप्रमाणे प्रकार आहेत.
अ) सपाट छताचे शेडनेटगृह (फ्लॅट रुफ)
ब) गोलाकार छताचे शेडनेटगृह (डोमशेष रुफ)
शेडनेटगृहासाठी जागेची निवड
शेडनेटगृह उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर जागेची निवड चुकली तर शेडनेटगृहातील पीक लागवड अपयशी ठरू शकते. त्यासाठी जागेची निवड करताना खालील बाबींचा अवलंब करणे आवश्यक असते.
१. जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. निचरा होणारी जमीन नसेल तर शेडनेटगृहाभोवती चर अथवा दांड काढावा की ज्यातून पाण्याचा निचरा होईल व शेडनेटगृहामध्ये जमीनीतील पाण्याची पातळी पिकाच्या मुळांच्या खाली राहील.
२. पाणथळ जागा शेडनेटगृहासाठी निवडू नये व तसेच शेडनेटगृहाची जागा खोलगट ठिकाणी नसावी.
३. पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ दरम्यान व क्षारतेचे प्रमाण कमी Ecc1mmhas/cm असलेल्या जागा योग्य असतात.
४. पाणी पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी. तसेच विद्युतपुरवठ्याची सुविधा असावी.
५. इमारती, मोठे वृक्ष, इ. ची सावली शेडनेटगृहावर पडणार नाही अशी जागा निवडावी…
६. निवडलेल्या जागेत भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. शेडनेटगृहाची दिशा शेडनेटगृह उभारताना गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची दिशा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) अशी ठेवावी. यामागचा हेतू म्हणजे पश्चिमेकडून वाहणारा वारा सहजपणे पूर्वेकडून निघून जाण्यासाठी शेडनेटगृहाची लांबी दक्षिणोत्तर घेणे योग्य असते.
शेडनेटगृहात लागवडीसाठी योग्य पिके कोणती?
शेडनेटगृहाचा उपयोग प्रामुख्याने उच्च मुल्यांची भाजीपाला पिके व फुलपिके यांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. तसेच बिगर हंगामी पिके घेण्यासाठी सुध्दा शेडनेटगृहाचा उपयोग होतो, मुख्यतः खालील पिके शेडनेटगृहात लागवडीसाठी घेतली जातात..
१. ढोबळी मिरची
२. टोमॅटो
३. काकडी
४. ब्रोकोली
- इतर भाजीपाला पिके जसे की काकडी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, वांगी, मिरची, भेंडी,