Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील 48 तासांसाठी राज्याच्या ‘या’ ठिकाणी ‘मौसम मस्ताना’; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

हवामान

Havaman Andaj । सप्टेंबर महिन्यामध्ये देशासह राज्यभर चांगला मुसळधार पाऊस कोसळला आहे. मात्र आता देशातील काही राज्यांमधून पावसाने काढता पाय घेण्यात सुरुवात केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला नाही. दरम्यान आता राज्यात पुढील 48 तासासाठी सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

हवामान विभागाने, सातारा, पुणे, सांगली, पट्ट्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबरकोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीसह मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Havaman Andaj । सावधान! राज्यातील 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; उद्या कशी असेल पावसाची स्थिती?

दरम्यान, रविवार आणि सोमवारी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हवामान विभागाचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. विदर्भ तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

आज कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस?

हवामान विभागाने आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उपनगरात देखील पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान दिला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात इतर भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल असं देखील हवामान विभागाने सांगितलं आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांनो, तुम्ही एकाच रोपातून वांगी, टोमॅटो आणि मिरची काढू शकता, ICAR ने तयार केली एक अप्रतिम वनस्पती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *