Havaman Andaj

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

हवामान

Havaman Andaj । देशासह राज्यात मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. राज्यामध्ये पावसाने मागच्या काही दिवसापूर्वी अक्षरशः थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी तर पूरसदृश्य (Rain in Maharashtra) परिस्थिती देखील निर्माण झाली. परंतु आता देशासह राज्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

राजस्थान, हरियाणात चक्राकार वारे वाहत आहे असून तामिळनाडूमधील किनाऱ्यालगतची चक्राकार वाऱ्यांची स्थिती तशीच कायम आहे. अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यांपासून ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान सातत्याने ३५ अंशांच्या पुढे आहे.

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

तापमानात वाढ

काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत जळगावमध्ये राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची तर ब्रह्मपूरी, अकोला, सोलापूर, वाशीम येथे तापमान ३६ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, आज राज्यात ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *