Havaman Andaj । देशात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाविना शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हवामानात बदल झाल्याने देशाच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
हवामान खात्याच्या मतानुसार, (IMD Alert) येत्या काही दिवसांत दक्षिणेकडील केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधील वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या 24 तासांत देशभरात हवामान कसे असेल याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.
Animal Husbandry | गायी आणि म्हैशींचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय! होईल फायदा
कसे राहणार हवामान?
हवामान खात्याच्या मतानुसार, येत्या 24 तासांत किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडेल. किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.
Black Austrolorp । कडकनाथ नाही तर ‘ही’ कोंबडी मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न, आजच करा पालन
कसे असेल दिल्लीचे हवामान?
दिल्ली आणि त्याच्याशी संबंधित एनसीआर भागात पावसाच्या शक्यतेसह ढगाळ वातावरण राहू शकते. तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असणार आहे.
हिमाचल आणि उत्तराखंड
आज आणि उद्या हिमाचलमध्ये हलक्या पावसासह बर्फवृष्टी होऊ शकते. IMD नुसार, आजपासून 5 नोव्हेंबरपर्यंत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विविध ठिकाणी पाऊस किंवा बर्फवृष्टी होईल.