Ration Card Application । देशातील गोरगरीब लोकांकडे मोफत धान्य पोहचवण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड फक्त धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे. समजा तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर तुमची अनेक महत्त्वाची कामे होऊ शकणार नाही. त्यामुळे आजच रेशन कार्ड काढून घ्या.
परंतु काही रेशन कार्ड दुकानदार नवीन रेशन कार्ड बनवून देत नाहीत, याबाबत अनेक तक्रारी केल्या जातात. समजा तुमचाही रेशन दुकानदार तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवून देत नसल्यास तर काळजी करू नका. तुम्ही आता रेशन कार्डसाठी घरबसल्या अर्ज करू शकता. त्यासाठी काही प्रोसेस तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
असा करा अर्ज
तुम्हाला राज्य शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल. www.mahafood.org.in या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन हा पर्याय पाहायला मिळेल. आता रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा. पुढे तुम्हाला पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. साइन-अप हिअर या पर्यायावर क्लिक करा. अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करून तुमच्या समोर येणारा फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्या.
Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन
फॉर्म जमा करा. काही दिवसात तुमचे रेशन कार्ड मंजूर होईल. त्याबाबत तुमच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या तहसील कार्यालयातून किंवा तुमच्या रेशन दुकानदाराकडून रेशन कार्ड घेऊ शकता.
कोणाला करता येतो अर्ज?
भारतीय नागरिक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो. 18 वर्षांखालील मुलांचे नाव पालक रेशन कार्डमध्ये समावेश करू शकतात. 18 वर्षांपुढील व्यक्ती वेगळ्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात. .
Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती