Maharashtra Drought

Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन

बातम्या

Maharashtra Drought । यावर्षी राज्यावर मोठे संकट आले आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. यंदा राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळजन्य (Drought) परिस्थिती ओढवली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी पुन्हा अनुदानाला सुरुवात, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

या बैठकीत महाराष्ट्रातील 40 तालुक्यांनी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून दुष्काळग्रस्त तालुक्यांना केंद्र सरकारने मदत जाहीर करावी अशी विनंती केली जाणार आहे. दरम्यान, “आवश्यक ते निकष निश्चित करून दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या मंडळाकरीता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीकडून निर्णय घेण्यात यावा”, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.

Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती

मिळणार या सवलती

याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळी तालुक्यांना मदत मिळेल. दुष्काळग्रस्त तालुक्यांत काही सवलती लागू केल्या आहेत. त्यानुसार कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सवलत, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परिक्षा शुल्क माफ करणे, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा सवलती या तालुक्यांना मिळतील.

Gas Cylinder Price । महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

केवळ 12 टक्के पेरण्या पूर्ण

बैठकीत दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2O16 मधल्या तरतूदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेतले आहेत. राज्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट आली आहे, धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत केवळ 12 टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील ५ दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *