Gas Cylinder

Gas Cylinder Price । महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

बातम्या

Gas Cylinder Price । प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो. देशात मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. दिवाळीपूर्वीच गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमती बदलल्या आहेत.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील ५ दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात खूप मोठी वाढ झाली आहे. तेल वितरण कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत एकूण 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. परंतु आता या महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी पुन्हा गॅस सिलिंडरचे दर वाढवले (Gas Cylinder Price Hike) आहेत.

Animal Husbandry | गायी आणि म्हैशींचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय! होईल फायदा

देशातील प्रमुख शहरांमधील दर

मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1833 रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1943 रुपयांवर गेली आहे, चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली आहे.

Lemongrass tea | खर्च कमी पण उत्पन्न जास्त! लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे ‘हे’ पीक घेऊन बघाच

मागील महिन्यातही वाढले दर

मागील महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 209 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1731.50 रुपयांवर आली असून सलग दुसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या किमतींत पुन्हा वाढ केली आहे.

Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *