Krushi Seva Kendra । शेती हा व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. पूर्वीपेक्षा सध्या शेती करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहेत. अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने पिके घेऊ लागली आहेत. त्याचा त्यांना लाभ होत आहे. यंत्रांच्या साह्याने शेती केल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. शेतीसाठी औषधे, कीटकनाशकांची आवशक्यता असते.
Kharip Pik Vima । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार ६१३ कोटींची विमा भरपाई
बऱ्याचदा या वस्तू एकच जागी मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्या ठिकाणहून आणावे लागतात. आता तुम्ही या सर्व वस्तू कृषी सेवा केंद्रातून कमी किमतीत खरेदी करू शकता. आता तुम्ही देखील कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे परवाना (Krushi Seva Kendra License) असावा लागतो. परवान्याशिवाय तुम्हाला हा व्यवसाय सुरु करता येणार नाही. जाणून घेऊयात नियमावली.
या ठिकाणी करा अर्ज
तुम्ही आता कृषी सेवा केंद्राचा परवाना (License of Krishi Seva Kendra) मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर जावे लागेल.
Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
पात्रता
- बी टेक
- बीएससी
- बीएससी( ॲग्री)
- कृषी पदविका 2 वर्ष
Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर
आवश्यक कागदपत्रे
- शॉप अॅक्टचं प्रमाणपत्र
- शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- दुकानाची जागा मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार
- जिथं दुकान टाकायचं आहे त्या जागेचा गाव नमुना-8
Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध
शुल्क
रासायनिक खते विक्रीचा परवाना – 450 रुपये
कीटकनाशके विक्रीचा परवाना – 7,500 रुपये
बियाणे विक्रीचा परवाना – 1,000 रुपये
Lek Ladki Yojana । गोरगरीब मुलींना मिळणार लाखो रुपये, काय आहे सरकारची भन्नाट योजना? जाणून घ्या
परवाना नूतनीतकरण
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे दर 5 वर्षांनी नूतनीतकरण करावे लागणार आहे.
Crop Milling । मळणी यंत्राद्वारे पीक काढणी करताय? घ्या आवश्यक खबरदारी, अन्यथा होईल मोठे नुकसान
..तर परवाना होतो रद्द
- समजा तुम्ही कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीररित्या खते, बियाणे किंवा कीटकनाशकांची विक्री करत असाल तर तुमचा परवाना रद्द होतो.
- जर तुम्ही परवान्याचं नूतनीतकरण केले नाही तर तुमचा परवाना रद्द होतो.