Maharashtra Drought

Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

बातम्या

Maharashtra Drought । यावर्षी राज्यावर मोठे संकट आले आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. यंदा राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळजन्य (Drought) परिस्थिती ओढवली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध

मिळणार या सवलती

महाराष्ट्रातील 40 तालुक्यांनी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांत काही सवलती लागू केल्या आहेत. त्यानुसार कृषी पंपांच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सवलत, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परिक्षा शुल्क माफ करणे, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा सवलती या तालुक्यांना मिळतील.

Lek Ladki Yojana । गोरगरीब मुलींना मिळणार लाखो रुपये, काय आहे सरकारची भन्नाट योजना? जाणून घ्या

फळपीके आणि बागायतदार

बहुवार्षिक फळपीके आणि बागायती पिकांच्या नुकसानाची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामे व सातबारा नोंद गरजेची असेल. यातील नोंदींनुसार निराकरण महाराष्ट्र जमीन संहितेमधील तरतूदीनुसार केली जाईल.

Crop Milling । मळणी यंत्राद्वारे पीक काढणी करताय? घ्या आवश्यक खबरदारी, अन्यथा होईल मोठे नुकसान

शाळांमध्ये मुलांना मिळेल पौष्टीक अन्न

दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत राबवल्या जाणार आहेत.

Fodder Crop । शेतकरी बांधवांनो, पौष्टिक चाऱ्यासाठी पर्याय शोधत आहात? तर मग लसूणघास चारा पिकाची लागवड कराच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *