Wild animal attacks

Wild animal attacks । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार २० लाख रुपये

बातम्या

Wild animal attacks । हल्ली वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण (Animal attacks) खूप वाढले आहे. लहान मुले, वयोवृद्ध आणि तरुणांवरही वन्यप्राणी हल्ले करतात. सर्वात जास्त हल्ले हे शेतकऱ्यांवर होत असतात. कारण त्यांना रात्र असो किंवा दिवस, कोणत्याही वेळी शेतात जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो.

मिळणार २० लाख रुपये

त्यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. आता याबाबत एक मोठी बातमी आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. शेतकऱ्याचा जर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला २० लाख रुपये मिळणार आहेत. वनविभागामार्फत ही कार्यवाही राबवण्यात येत आहे.

अनेकवेळा गोदावरी भागात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. पूर्वी सरकारतर्फे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एखाद्याचा मृत्यू झाला किंवा कायम अपंगत्व आले तर तुटपुंजी मदत देण्यात येत होती. परंतु, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्याचा मृत्य झाला तर त्याला २० लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे.

४८ तासांत द्या माहिती

इतकेच नाही तर शेतकऱ्यांना वन्य प्राण्याच्या उपद्रवांमुळे पिकांच्या नुकसानीपोटी शासकीय मदत देण्यात येते. परंतु, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेळेत अर्ज करावा लागतो., तर त्याचा त्याला लाभ मिळतो. अन्यथा त्याला लाभापासून वंचित राहावे लागते. हल्ला झाल्यानंतर गावातील वनमजुरामार्फत ती घटना वनरक्षकांना याची माहिती द्यावी लागते.

माहितीनंतर वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी येऊन पंचांसमक्ष पंचनामा करतात. पंचनाम्यानुसार दिल्या जाणाऱ्या अहवालानुसार शासकीय स्थरावरून लाभार्थीच्या खात्यात मदत जमा होते. वन्यप्राण्यांकडून झालेला हल्ला असो किवा पिकांचे नुकसान असो याची माहिती संबंधितांनी वनविभागाला ४८ तासांत द्यावी लागते हे लक्षात ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *