what-is-7-12

७/१२ म्हणजे काय रे भाऊ ?

बातम्या

जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीतकमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना, समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र. १ ते २१ या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील ७ नंबरचा नमुना मालकीहकाबाबतचा आहे तर १२ नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून ७/१२चा नमुना प्रस्तावित करण्यात आला.

Agri College । लवकरच ‘या’ जिल्ह्यात सुरु होणार सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय, वनमंत्र्यांची मोठी घोषणा

७/१२ उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु ७/१२ हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही. सर्व शेतकऱ्यांनी हा मुद्दा अतिशय काळजीपुर्वक समजावून घेतला पाहिजे.

Pik Vima । पीक विमा योजनेने महाराष्ट्रात रचला इतिहास, पहिल्यांदाच १.७१ कोटी शेतकऱ्यांनी केली नोंदणी

उदाहरणार्थ, गणपत नांवाच्या शेतकऱ्याने त्यांच्या मालकीची १ हेक्टर जमीन ५ में २००० रोजी गोविंद नावाच्या शेतकऱ्यास रजिस्टर खरेदीखताने विकली. रजिस्टर दस्त ५ मे रोजीच नोंदविला. ६ मे २००० रोजी या जमीनीचा मालक कोण ? असा प्रश्न विचारला तर खरेदीदार रामचंद्र हाच मालक ठरतो. परंतु ६ तारखेला ७/१२ वर गणपतचेच नांव असू शकते. बऱ्याचवेळा खरेदीविक्रीनंतर ३-४ महिन्यांनी ७/१२ वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकी हक्क ३-४ महिन्यांनी निर्माण होतो असे नाही.

Cotton rate । कापसाच्या भावात मोठी घसरण, पाहा किती मिळतोय दर?

७/१२ उतारा हा प्रत्येक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे. त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारण पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) मध्ये लिहिलेला असतो.

Chicken farming । कडकनाथ आणि सोनाली जातीच्या कोंबडीचे पालन करून तरुण कमावतोय लाखो रुपये, युट्युबवरून घेतली माहिती

सर्वसाधारणपणे दर दहा वर्षानी ७/१२ पुस्तके नव्याने लिहिली जातात. ज्यांचा हब आलेला नाही, अशा हुन्या नोंदी वगळून नव्याने ७/१२ उतारे लिहिले जातात. १/१२ कौल मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्त्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय ७/१२ वर येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकऱ्याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नांव ७/१२ वर कसलाही कायदेशीर आधार नसतांना नोंदलेले आहे, तर त्याने जुने ७/१२ उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.

Importance of bull selection | वळूच्या निवडीचे महत्व

दैनंदिन जीवनांत आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, इलेक्ट्रीसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात. परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला ७/१२ चा नमुना अनेकांना अनाकलकनीय वाटतो. त्यामुळे • जाणीवपूर्वक ७/१२ उतारा म्हणजे काय हे शांतपणे समजून घेतले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *