आज एखादा इसम कूळ होऊ शकतो का ? कूळ कायदा कलम ३२ (ग) नुसार दिनांक १/४/५७ रोजी जमीन कसणाऱ्या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने कूळ निर्माण होऊ शकतो काय ? व असल्यास कशापद्धतीने कूळ निर्माण होतो याबाबत शेतकऱ्यांमध्ये कुतूहल आहे. याबाबतची तरतूद कूळ कायद्याच्या कलम ३२ (ओ) मध्ये नमूद करण्यात आली आहे.
कूळ कायदा कलम-३२ (ओ) नुसार आजही दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेल तर तो कूळ असल्याचा दावा करू शकतो. तथापि त्यासाठी खालील महत्त्वाच्या अटी कायम आहेत.
(अ) वहिवाटदार व मालक यांच्यात कतार झाला असला पाहिजे.
(ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे.
(क) तो खंड देत असला पाहिजे.
(ड) जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नातेसंबध असले पाहिजेत.
Cotton rate । कापसाच्या भावात मोठी घसरण, पाहा किती मिळतोय दर?
आजकाल जमीन मालक स्वतःहून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम-३२ (ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीचे कोणतेही करार तो वहिवाटदाराबरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे व एक वर्षाच्या पिक पाहणीचा ७/१२ जोडून दिवाणी न्यायालयातून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम-३२ (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशाप्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्वसाधारपणे करतात.