Agri College

Agri College । लवकरच ‘या’ जिल्ह्यात सुरु होणार सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय, वनमंत्र्यांची मोठी घोषणा

बातम्या

Agri College । अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची (Advanced technology) जोड देत विविध प्रयोग केले जातात. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आधुनिक पद्धतीने पिके घेतल्याने त्याला बाजारात चांगली मागणी असते. सरकार देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Government Schemes) सुरु करत असते. अशातच आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठी घोषणा केली आहे.

Chicken farming । कडकनाथ आणि सोनाली जातीच्या कोंबडीचे पालन करून तरुण कमावतोय लाखो रुपये, युट्युबवरून घेतली माहिती

सुरु होणार सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय

तरुणांचा शेतीकडे कल वाढावा आणि त्यांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान तरुणांना मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी महाविद्यालय (College of Agriculture in Chandrapur) सुरु केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय उभारले जाईल, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

Importance of bull selection | वळूच्या निवडीचे महत्व

खरंतर अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास 28 फेब्रुवारी 2019 मध्ये मान्यता दिली होती. 35 कोटी रुपयांचे अनुदान आतापर्यंत विद्यापीठास वितरीत केले. मूल-मारोडा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या उपलब्ध इमारतीमध्ये सन 2019-20 या सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू केले असून 1 ऑक्टोबर 2022 पासून मॉडेल स्कूल, मूल येथे सदर महाविद्यालय भाडेतत्वावर स्थलांतर केले आहे.

Havaman Andaj । पर्वतांवर बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी वाढली, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू; जाणून घ्या आजचे हवामान कसे असेल?

निधीची कमतरता भासणार नाही

शेतकरी शेतात घाम गाळून अन्न पिकवत असतो, त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी निधीची कसलीच कमतरता भासणार नाही. कृषी आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटी रुपयांवरून किमान 10 हजार कोटी असावे. त्यासाठी आता हा विषय मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार आहे.

Onion Export । ‘या’ कारणामुळं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना केलं निलंबित; समोर आलं मोठं कारण

दरम्यान, मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी वनजमीन वळतीकरण करण्याबाबत आणि विशेष निधी उपलब्ध होण्याबाबत वनामती (नागपूर) येथे आढावा बैठक घेतली होती. तेव्हा मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूरचे पालकसचिव अनुपकुमार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलसचिव सुधीर राठोड, प्रधान मुख्य संरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर,जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, इतर मान्यवर उपस्थित होते.

Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *