दीर्घकालीन फायदेशीर दूधव्यवसायासाठी अधिकतम दूध उत्पादन तसेच, निरोगी जनावरे आवश्यक असतात. कृत्रिम रेतन करताना आपणच आपल्या दुग्धव्यवसायातील पुढच्या पिढीचे भविष्य ठरवत असतो. एकदा चुकीने / चुकीची जन्मलेली कालवड (गाय) १० ते १५ वर्षांपर्यंत उत्पादकाला सांभाळावी लागते. तिच्या निकृष्ट जन्मजात अनुवंशिक गुणदोषांसह संगोपन करावे लागते. ही निवड चुकल्याने अनेक दुष्परिणाम बऱ्याच काळासाठी भोगावे लागतात.
- वळूचे निवडावयाचे गुण :
१) दूध उत्पादकतेत वाढ होणे.
२) स्तनदाहाचे प्रमाण कमी करणे.
३) फॅट टक्केवारी कमी न होणे
४) रोगप्रतिकारशक्ति व सुदृढ शरीर असणे
५) शारीरिक व्यंगविरहित
६) कालवडींमधील कासेची व पायाची ठेवण (स्तनदाहनियंत्रण व खुराच्या रोगांचे प्रमाण कमी करण्यामध्ये मदत करते )
७) फायदेशीर दूध उत्पादन आयुष्यमान (वाढीव वेते )
Onion Export । ‘या’ कारणामुळं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना केलं निलंबित; समोर आलं मोठं कारण
वरील गुणांचा एकत्रित विचार करुन वळूची निवड करावयाची असते.
■ सिद्ध वळू : वळूची सिद्धता म्हणजे फक्त वळूच्या पूर्वजांनी (आई व आजी) दिलेल्या दूध उत्पादनाच्या आकडयावर तथा इतर गुणांवर केलेली निवड नव्हे, तर प्रत्यक्षात त्या वळूपासून पैदास झालेल्या अनेक कालवडींची, इतर समवयस्क वळू व निवडक वळूपासून पैदास झालेल्या अनेक कालवडींशी तुलना करुन, नंतरच या तरुण वळूचे वर्गीकरण करुन, त्यातल्या वरील गुणसंपन्न उत्तम कालवडी देणाऱ्या वळूची निवड करण्यात येते, यालाच ‘सिद्ध वळू’ म्हणतात. (सिद्ध वळूचा तक्ता पहा) दरवर्षी फार तर २ ते ३% वळू सिध्द होत असतील.
Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…
उत्तम व्यवस्था असलेल्या प्रक्षेत्रावर निरोगी व उत्तम अनुवंशिकता असलेल्या वळूचेच वीर्यसंकलन व्हावे व त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हावा. वळूच्या पूर्वीच्या सर्व पिढयांची दैनंदिन माहिती संकलित असावी. वळूच्या वीर्य उत्पादन क्षमतेनुसार त्याचे वर्गीकरण असावे. वळूच्या वीर्यदानातून जन्मलेल्या गायीच्या दूधउत्पादन क्षमतेचा अभ्यास उपलब्ध असावा. खराब निष्कर्ष असलेला वळू वीर्यसंकलनातून कमी व्हावा, वळूच्या निवडीचा पर्याय शेतकऱ्यांना खुला असावा व अशा विर्यनळयांची उपलब्धता सहज व्हावी, वळू निवडी संबंधीच्या शास्त्रीय माहितीचा प्रसार व्हावा, तरच उत्तम दर्जाच्या अधिक दूध देणाऱ्या निरोगी कालवडींची पैदास हा वळूच्या निवडीमागचा उद्देश सफल होईल व दुग्धव्यावसायिकांना आताच्या परिस्थितीत दूध व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर करता येईल.
Onion Farmer । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय