Cow Milk Increase Tips । राज्यात जरी मोठ्या प्रमाणात शेती केली जात असली तरी प्रत्येक वर्षी शेतमालाला चांगला हमीभाव असतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. या व्यवसायातून जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची (Animal husbandry) निवड करावी लागते. नाहीतर तुम्हाला या व्यवसायातून आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.
Success Story । नोकरीला केला जय महाराष्ट्र! फळशेतीतून हा शेतकरी कमावतोय लाखो रुपये
उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो, कारण या दिवसात दुधाचे उत्पादन (Milk production) कमी प्रमाणात होते. कमी उत्पादन मिळाल्याने शेतकरी हतबल होतात. उत्पादन जास्त मिळण्यासाठी काही शेतकरी जनावरांना काही औषधेदेखील देतात. तरीही या औषधांचा फारसा परिणाम होत नाही. याउलट जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
चवळीचा पाला
पण तुम्ही आता काही घरगुती उपायांनी यावर मात मिळवू शकता. दूध उत्पादनात वाढ (Increase in milk production) होण्यासाठी तुम्ही चवळीच्या पाल्याचा समावेश करू शकता. या पाल्यात अनेक पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा जनावरांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.
करा हे उपाय
यासाठी तुम्हाला एका वेळी 250 ग्रॅम गव्हाचे पीठ, 50 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम गुळ, एक कच्चे खोबरे, 25-25 ग्रॅम जिरे या गोष्टींची गरज भासेल. गहू पीठ, मेथी, जिरे आणि गूळ चांगला शिजवून घेऊन खोबरे बारीक करून यामध्ये टाका. हे थंड झाल्यावर ते जनावरांना खाऊ घाला. जनावरांना सकाळी रिकाम्या पोटी उन्हाळयात हे 2 महिने खायला द्यावे.
Milk Subsidy । पशुपालका़ंसाठी महत्त्वाची बातमी, आता टॅगिंग असेल तरच मिळणार दुध अनुदान
त्याशिवाय तुम्ही दररोज जनावरांना गव्हाच्या पिठाचा गोळा देऊ शकता. मोहरीचे तेल आणि गव्हाच्या पिठापासून दूध वाढवण्यासाठी, तुम्ही दररोज 200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 250 ग्रॅम गव्हाचे पीठ असलेला गोळा देण्याचा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की हा गोळा दिल्यानंतर लगेचच जनावराला पाणी पाजू नये, नाहीतर जनावरांना खोकला येईल.