Animal Care

Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर

पशुसंवर्धन

Animal Care । शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी मदत करत असते. ज्याचा फायदा त्यांना होतो. अनेकांना फक्त शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यात अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतु तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर अशा गाई आणि म्हशींच्या जातींचे पालन करा ज्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल.

Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा

जर वातावरणात बदल झाला तर जनावरे आजारी (Animal disease) पडू लागतात. वातावरणातील बदलांमुळे आणि संसर्गामुळे जनावरांना वेगवेगळे आजार जडतात. परंतु, आता तुम्ही या आजारावर घरच्या घरीच उपचार करू शकता. यामुळे तुमचा दवाखान्याला खर्च होणाऱ्या पैशांची बचत होईल आणि तुमचे जनावर लवकरात लवकर बरे (Medicinal treatment) होईल.

Agriculture News । पीक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करायचाय? तर मग ही बातमी वाचाच

पचनसंस्था आजार

  • जर जनावरांनी खाद्य योग्य रीतीने खाल्ले नाही तर पचन संस्थेचे आजार होतात.
  • यात भूक मंदावणे, कधी-कधी पोट गच्च होणे, चारा न खाणे, रवंथ न करणे आणि मलावरोध यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो.

Success Story । शेतकऱ्याची कमाल! अवघ्या दीड महिन्यात 40 गुंठे कोथिंबिरीतून घेतले तीन लाखांचे उत्पन्न

उपाय

  • यासाठी जीरा १० ग्रॅम, काळी मिरी १० ग्रॅम, ओवा १० ग्रॅम, धने २० ग्रॅम, मेथी २० ग्रॅम, आले ५० ग्रॅम, कढी पत्ता १०० ग्रॅम, लसूण ५० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, गुळवेल १०० ग्रॅम, कोरफड १०० ग्रॅम, लाल तिखट ५० ग्रॅम, सुका नारळ १०० ग्रॅम, विडा पाने १०, तुळस पाने १०० ग्रॅम, गूळ १०० ग्रॅम, शेदे मीठ १०० ग्रॅम आणि खाण्याचा सोडा १०० ग्रॅम गरजेचा आहे.
  • सर्वात आधी सुके घटक दळून बारीक पूड तयार करा. त्यानंतर ओले घटक बारीक करून त्यात गूळ आणि शेदे मीठ मिसळा.
  • याच्या १०० ग्रॅम वजनाच्या लिंबू आकाराच्या गोळ्या तयार करून गाई,म्हशींना १ गोळी, वासरे, शेळी-मेंढ्यांना अर्धी गोळी किंवा लहान जनावरांच्या वजनानुसार दर महिन्याला तोंडावाटे उपाशीपोटी द्या. हा आजार बरा होईल.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतेय पीएम किसानची रक्कम

श्‍वसनाचे आजार

  • वातावराणातील अचानक बदलांने जनावरांना खोकला आणि सर्दी होते. त्यांच्या नाकपुडयांतून चिकट स्त्राव वाहतो.

Success story । शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळावर मात करत गुगल, युट्युबच्या मदतीने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती

उपचार

  • यासाठी अडुळसा पाने १०० ग्रॅम, १०० ग्रॅम तुळशीचे पाने, अद्रक ५० ग्रॅम, काळी मिरी १० ग्रॅम व १०० ग्रॅम गूळ १ लिटर पाण्यात उकडून काढा तयार करून जनावरांना दिवसातून ३ वेळा २५० मिलि काढा ३ दिवस पाजा.

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

गोचीड ताप

लक्ष न दिल्याने जनावरांना गोचीड ताप येतो. त्यांची शारीरिक वाढ खुंटून दुग्ध उत्पादनात घट होते.

Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

उपचार

  • कडुनिबांची पाने, प्रत्येकी २० ग्रॅम आले, तुळस, हळद पावडर आणि सीताफळाच्या बिया एकत्रितपणे चांगली बारीक करून २५० मिलि कडुनिबांच्या तेलात उकळून घ्यावे. ते थंड झाल्यावर तयार मिश्रण जनावरांच्या शरीराला लावा.

Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

अतीसार आजार

खराब, बुरशीजन्य चारा जर जनावरांनी खाल्ला तर जनावरांना हगवण लागते. समजा हगवण ३ दिवसांपेक्षा अधिक दिवस असेल तर शरीरातील पाणी आणि इतर शारीरिक पोषके कमी होतात. त्यामुळे जनावर अशक्त आणि कमजोर होतात.

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

उपचार

  • पेरू, कडुनिंबाची पाने, एक ओंजळ चांगले बारीक दळलेले कोवळे डाळिंब, ५० ग्रॅम सुंठ पावडर आणि १०० ग्रॅम गूळ यांच्या मिश्रणाच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या तयार करा.
    प्रत्येकी ३ गोळ्या एकावेळेस म्हणजेच दिवसातून ३ वेळा हगवण बरी होईपर्यंत जनावरांना खायला द्या.
  • जनावराच्या शरीरातील पाणी कमी झाले असेल त्यांना पाणी, साखर व मीठ यांचे द्रावण पाजा.

Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई

पोटफुगी आजार

जर चाऱ्यात अचानक बदल झाला तर जनावरांना पोटफुगीची समस्या निर्माण होते. असे झाले तर जनावरांना श्‍वास घ्यायला त्रास होतो. जर पशुपालकांनी याकडे लक्ष नाही दिले तर जनावरांचा मृत्यू होतो.

Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

उपचार

  • सर्वात अगोदर २०० मिलि एरंडी तेल २०० मिलि कोमट पाण्यात मिसळून पोटफुगीग्रस्त जनावरांना ४ तासांच्या फरकाने तोंडावाटे पाजा.
  • १० ग्रॅम काळी मिरी, २० ग्रॅम आले, १० विड्याची पाने, १० ग्रॅम लसूण, ५० ग्रॅम सेंदे मीठ यांचे कोमट पाण्यात मिश्रण तयार करा. हे मिश्रण मोठया आणि लहान जनावरांना वजनाप्रमाणे ६ तासांच्या अंतराने पाजा.

Animal husbandry । आलिशान कारपेक्षा महाग म्हैस! किंमत जाणून व्हाल थक्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *