Gift Deed

Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेती कायदे

Gift Deed । आज अनेकजण शेती करतात. अनेकांकडे खूप जमीन असते, तर काही जणांकडे थोड्या प्रमाणावर जमीन असते. जमिनीशी निगडित अनेक महत्त्वाची कागदपत्रे (Land Document) असतात. यातील एक जरी कागदपत्र गहाळ झाले किंवा हरवले तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी जमिनीचे बक्षीस पत्र (Gift Deed Information) हे देखील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे.

Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

बक्षीस पत्र म्हणजे काय?

अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते. एखाद्या जमिनीचा मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. मृत्युपत्र हे कागदपत्र सोडल्यास बाकी कागदपत्रांची अंमलबजावणी व्यक्ती हयात असतानाच होते. जवळील नात्यांत किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या जे काही बक्षीस पत्र असतात याबद्दलच्या कायदेशीर तरतुदी या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या कलम 122 व 126 मध्ये नमूद करण्यात आली आहेत.

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

बक्षीस पत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीला दाता तर बक्षीस पत्र स्वीकारणाऱ्या व्यक्तीला लाभार्थी असे म्हटले जाते. रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना संपत्ती बक्षिस रूपाने देण्यात येते. भविष्यात यात कोणते वाद होऊ नये यासाठी कायदेशीररित्या बक्षीस पत्र तयार करून घेणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे बक्षीस पत्र बनवताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

त्यानंतर बक्षीस पत्राचे नोंदणी ही स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये करावी लागते. ही नोंदणी केली तरच बक्षीस पत्राला कायदेशीर मान्यता मिळते. यात भविष्यात मुलांना हस्तांतरित केली जाणारी मालमत्ताआई वडिलांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये असे नमूद करण्यात येते. अनेकांना बक्षीस पत्र रद्द करता येते का असा प्रश्न पडतो. जाणून घेऊयात याबद्दल.

Onion Rate । आज कांद्याला सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

बक्षीसपत्र रद्द होते का?

काही अपवादात्मक परिस्थितीत बक्षीसपत्र रद्द करता येते. एखादी घटना किंवा काही गोष्ट घडली तर बक्षीस पत्र रद्द होण्याची शक्यता असते. यात एखादी विशिष्ट अशी गोष्ट घडणे किंवा न घडणे यावर दात्याचे नियंत्रण असेल तर बक्षीस पत्र रद्द होत नाही.

Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *