Amul Price Hike । सोमवारपासून अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता अमूल गोल्डची किंमत 64 रुपये/लिटरवरून 66 रुपये/लिटर होणार आहे. तर अमूल टी स्पेशलची प्रतिलिटर किंमत ६२ रुपयांवरून ६४ रुपयांपर्यंत वाढणार आहे. एवढेच नाही तर अमूल शक्तीचा भाव ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढणार असून, दह्याचे दरही वाढले आहेत.
Farmer News । काय सांगता? शेतकऱ्याच्या खात्यात अचानक आले 100 अब्ज रुपये
याबाबत अमूलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु GCMMF ने नवीन किमतींसह यादी त्यांच्या वितरकांना पाठवली आहे, ज्यामुळे ही बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच अमूलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार, अमूल गोल्ड 500 मिली आता 32 रुपयांऐवजी 33 रुपयांना मिळणार आहे.
अमूल ताजा म्हणजेच टोन्ड दूध 500 मिलीची किंमत 26 रुपयांवरून 27 रुपये करण्यात आली आहे. अमूल शक्ती 500 मिलीची किंमत 29 रुपयांवरून 30 रुपयांपर्यंत वाढली आहे. अमूल ताजा स्मॉल सॅचेट्सच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. इतर सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.
किमती किती वाढल्या
अमूल गोल्डचे 500 मिली पॅकेट आता 32 रुपयांऐवजी 33 रुपयांना मिळणार आहे. अशाप्रकारे एक लिटरच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल शक्ती पॅक 30 रुपयांना आणि अमूल ताझा 27 रुपयांना उपलब्ध असेल. अमूल दूध पूर्वी ६४ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते, आता त्याची किंमत ६६ रुपये झाली आहे. ही वाढ 14 महिन्यांनंतर झाली आहे, कारण 1 एप्रिल 2023 रोजी गुजरातमध्ये अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.