
Monsoon News | मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याने (आयएमडी) सांगितले की नैऋत्य मान्सून रविवारी (9 मे) मुंबईत दाखल झाला आहे, जे नेहमीपेक्षा दोन दिवस आधी आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाळा सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आहे. लवकरच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु होणार आहे.
Amul Price Hike । मोठी बातमी! अमूल दूध महाग, लिटरमागे २ रुपयांनी वाढ; सोमवारपासून नवे दर लागू
11 जूनला अपेक्षित असलेला मान्सून 9 जूनला मुंबईत दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. सोमवारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. केरळ आणि देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये ३० मे रोजी मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला होता. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी आजपासून ११ जूनपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.
Farmer News । काय सांगता? शेतकऱ्याच्या खात्यात अचानक आले 100 अब्ज रुपये
9 ते 11 जून दरम्यान मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाण्यात 9 ते 10 जून रोजी ऑरेंज अलर्ट आणि 11 जून रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD नुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस ढगाळ आकाश असेल आणि वादळांसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. या काळात कमाल तापमान आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
यावेळी मान्सूनचा राग येणार नाही!
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यंदा हवामान खात्याने एप्रिल महिन्यातच दिलासादायक बातमी दिली. यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?
माहितीनुसार, कृषी विभागाच्या सल्ल्यानुसा आपल्या ठिकाणच्या जमिनीची आर्द्रता बघून, किती पाऊस पडलाय?, पुर्वानुमान बघून,त्याचा अंदाज घेऊन पेरणीचं नियोजन करावं, असं होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी सांगितल आहे.