Post Monsoon Rain

Post Monsoon Rain । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

हवामान

Post Monsoon Rain । लहरी निसर्गामुळे सतत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. यंदा देशाच्या काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ (Monsoon Rain) घातला होता. यंदा अनेक राज्यात पूरपरिस्थिती (Heavy Rain) निर्माण झाली होती. शेतीचे नुकसान झाल्याने टोमॅटोसह इतर भाजीपाल्यांचे दर वाढले होते. अशातच आता शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा सावट आले आहे. राज्यात अवकाळी पावसाने थैमान (Heavy Rain in Maharashtra) घालायला सुरुवात केली आहे.

Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या

राज्याला अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला तर त्यांच्यावर दुहेरी संकट येऊ शकते.

Rules of Land । शेतजमिनीवर घर बांधतायं? जाणून घ्या नियम नाहीतर पाडावे लागेल घर..

महत्त्वाचे म्हणजे खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. अशातच आता रब्बी हंगामात देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आता कर्ज काढून पेरणी करत आहेत. काही ठिकाणी खरीप पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

Agri Business । पशुपालकांची होणार चांदी! सुरु करा शेणापासून फरशा बनवण्याचा व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

वाढला कीड-रोगांचा प्रादुर्भाव

मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत ऊन आणि ढगाळ हवामान येत आहे. याचा परिणाम गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. साहजिकच शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. सततच्या फवारणीमुळे खर्चात देखील वाढ होत आहे.

Crop Insurance Scheme । आर्थिक नुकसानापासून वाचवते सरकारची ही खास योजना, सोप्या पद्धतीने घ्या योजनेचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *