Agricultural University

Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या

बातम्या

Agricultural University । भारताला कृषि प्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. सतत कृषी क्षेत्राच्या वाढीसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी वाढत चालली आहे. अनेकांना कृषी विषयात पदवी मिळविण्यात खूप आवड आहे. अनेकांना देशातील पहिल्या कृषी विद्यापीठाविषयी (Country First Agricultural University) माहिती नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Rules of Land । शेतजमिनीवर घर बांधतायं? जाणून घ्या नियम नाहीतर पाडावे लागेल घर..

अहवालांनुसार, देशातील पहिले कृषी विद्यापीठ गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असून याला “पंतनगर विद्यापीठ” आणि “पंत विद्यापीठ” (Pant University) असे देखील म्हटले जाते. 17 नोव्हेंबर 1960 रोजी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले, त्यावेळी त्याला उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ म्हणत.

Agri Business । पशुपालकांची होणार चांदी! सुरु करा शेणापासून फरशा बनवण्याचा व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

परंतु 1972 मध्ये, थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंद बल्लभ पंत यांच्या नावाने कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे नाव बदलून गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ केले गेले. हे विद्यापीठ उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील पंतनगर शहरात असून ते देशातील हरित क्रांतीचे प्रणेते मानले जाते.

Crop Insurance Scheme । आर्थिक नुकसानापासून वाचवते सरकारची ही खास योजना, सोप्या पद्धतीने घ्या योजनेचा लाभ

कृषी क्षेत्रात अनेक संधी

कृषी क्षेत्रात अनेक संधी असून पदवी, कृषी पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थी कृषी संशोधन शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, उत्पादन व्यवस्थापक, फार्म मॅनेजर बनू शकतात.

Sugarcane Harvesting । ‘कारखान्यांनी उचल जाहीर केल्याशिवाय चालू हंगामात ऊसतोडणी नाही’, रयत क्रांती संघटनेची आक्रमक मागणी

मिळेल सरकारी नोकरी

कृषी क्षेत्रात पदवी किंवा पदविकाधारकांना कृषी विभाग, कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे इत्यादी सरकारी नोकऱ्या मिळत असून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार अधिकारी यांचा समावेश होतो.

Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा

खाजगी क्षेत्रात नोकरी

इतकेच नाही तर कृषी क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या असून ज्या कृषी उत्पादनांचे उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंग करतात. त्याशिवाय कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविकाधारकांना या संस्थांमध्ये नोकरीच्या अनेक संधी देखील उपलब्ध आहेत.

Havaman Andaj । बिग ब्रेकिंग! पुढील ४ दिवस अवकाळीचं सावट, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना दिला जोरदार पावसाचा इशारा

व्यवसाय

आता कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविकाधारक स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. कृषी क्षेत्रात शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी उपकरणांचा व्यवसाय सुरू करता येतील.

Land Ownership । जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या गोष्टींमुळे बदल होतात? वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *