Land Ownership । सतत जमिनीशी निगडित वाद होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील मालकी हक्कात अचानक बदल झाला, वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीच नाव सातबारा (Saatbara) उताऱ्यावर लागले आहे, यांसारख्या तक्रारी अनेक जण करतात. महत्त्वाचे म्हणजे जमिनीच्या मालकी हक्कात (Land Rule) अनेक कारणांमुळे बदल होतो. त्यामुळे या समस्या येतात.
Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी
जमीन मालकी हक्क बदल
ज्यावेळी एका व्यक्तीच्या नावावरील मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होत असते त्यावेळी त्याला जमिनीच्या मालकी हक्कात बदल (Changes in land ownership rights) होणं असे म्हटले जाते. वारस नोंदीमुळेच मालकी हक्कात बदल होतो, असा अनेकांचा समज असतो. वारस नोंदींशिवाय इतर काही बाबी आहेत, त्यामुळे जमिनीच्या मूळ मालकाचं नाव जाऊन त्याजागी नवीन मालकाचं नाव लागले जाते.
या कारणांमुळे होतो बदल
- जमिनीची खरेदी आणि विक्री
जमिनीची खरेदी-विक्री झाली तर त्याचं खरेदी खत करतात. खरेदी खत जमिनीच्या मालकी हक्काचा पहिला पुरावा असतो. यात जमिनीचा व्यवहार किती तारखेला? किती क्षेत्रावर झाला याची सविस्तर माहिती असते. त्यानंतर ते तलाठ्याकडे जाऊन तलाठी फेरफार घेतात. यात उताऱ्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशी माहिती असते.
Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा
फेरफारावरील नोंदींची तपासणी करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येत. मंडळ अधिकाऱ्याला ते 25 दिवसांच्या आत मंजूर करावे लागते. त्यानंतर मग संबंधिताचं नाव सातबारा उताऱ्याव लागून जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.
MGNREGA । आता घरबसल्या तपासा तुमच्या गावातील सुरु असणारी मनरेगाची कामे, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
- वारस नोंद
जमिनीच्या मालकी हक्कात वारसांच्या नोंदीनंतर बदल होतात. एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या मालमत्तेवर वारसांची नावं लागतात. त्यासाठी संबंधित वारसांनी 90 दिवसांच्या आत तलाठ्याकडे अर्ज करणे गरजेचे असते. जर वारसांनी उशीर केला तर त्यांकडून कायद्याप्रमाणे दंड आकारण्यात येतो. वारसांच्या अर्जानंतर जमिनीच्या जुन्या मालकाचं नाव जाऊन नवीन मालकाचं नाव त्याजागी लागले जाते.
Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न
- सक्षम अधिकाऱ्याचा आदेश
मालकी हक्क बेकायदेशीरपणे मिळवला असल्यास सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानं मालकी हक्कात बदल होतो. एखाद्यानं चुकीचा दस्त दिला असल्यास त्याविरोधात अपील केलं तर त्यानंतर फेरफारात बदल करण्यात येतो. तो बदल सातबाऱ्यावर नोंदवण्यात येतो.
- भूसंपादन
सरकारी प्रकल्प किंवा सार्वजनिक कामाकरिता सरकारच्या माध्यमातून जमिनींचे संपादन होते. या प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांचे किंवा ज्या मालकाची जमीन संपादित झाली किंवा केली जातात, त्या व्यक्तीला बाजार मूल्यानुसार त्या जमिनीचा मोबदला देण्यात येतो. प्रक्रिया भूसंपादन व पुनर्वसन कायद्याच्या माध्यमातून होते. त्यानुसार संबंधित मालमत्तेवरील मूळ मालकाचे नाव जाऊन त्याजागी संपादन यंत्रणेचे नाव लागते.