Havaman Andaj । सध्या वातावरणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या थंडी मोठ्या प्रमाणात वाजत असून ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झाला असून देशातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे नागरिकांना कधी उकाडा, कधी थंडी त्याचबरोबर कधी पावसाचा देखील सामना करावा लागतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांची देखील मोठी तारांबळ उडाली आहे. (Havaman Andaj)
SCSS । दरमहा 20,500 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! शेतकऱ्यांनो त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक
सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. यामध्येच आता अवकाळी पावसाचे संकट ओढवल्याने बळीराजाचं टेन्शन वाढला आहे. यामध्येच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात मुंबई, पुणे, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Fruit processing industry । लगेचच सुरु करा फळप्रक्रिया उद्योग, सरकार देतंय १० लाखांपर्यंत अनुदान
त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला देखील कृषी विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर ढगाळ वातावरण असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
Cotton prices । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार दर
केरळ किनारपट्टीपासून दक्षिण अरबी समुद्रात खालच्या भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?
येत्या 24 तासात महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता हमान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. असे देखील कृषी विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे.
Cow Poisoning । धक्कादायक! विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान