Cow Poisoning

Cow Poisoning । धक्कादायक! विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

पशुसंवर्धन

Cow Poisoning । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. यात पशुपालनाचा (Animal husbandry) जोडव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून गाईचे दुधाचे दर कमी झाले आहेत. दर कमी झाल्याने पशुपालक हवालदिल झाला आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू (Cows Died) झाला आहे.

Satbara Utara । सातबारा देखील असतो बोगस! ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि ओळखा बनावट सातबारा

यामुळे व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अगोदरच घसरलेले दर आणि विषबाधेतून झालेल्या मृत्यूमुळे या व्यावसायिकांवर दुहेरी संकट आले आहे. अनेक वर्षापासून राजस्थान येथील लालगाईवाले दुग्ध व्यावसायिक निरगुडसर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे एकूण १५० गाई, कालवडी आणि वासरे आहेत. काना वामा भरवाड, हीरा खोडा भरवाड आणि देवकन गंगाजी भरवाड यांच्या १६ गाई, ४ कालवडींनी बटाट्याचा पाला खाल्ला.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

१० ते १५ लाखांचे नुकसान

त्यातूनच त्यांना विषबाधा झाली आणि त्या मृत्युमुखी पडल्या. त्यांना एकूण १० ते १५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. हे व्यावसायिक दुग्ध व्यवसाय आणि शेणखत विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरात असणारा बटाटा पाला, फ्लॉवर, कांद्याची पात आणि शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला आपल्या जनावरांना ते खाऊ घालतात.

Crop Insurance । शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा

३० ते ४० गायी अत्यवस्थ

दरम्यान, नेहमीप्रमाणे या व्यावसायिकांनी गायींना बटाट्याचा पाला खाण्यास दिला. परंतु तो चार खाल्ल्यानंतर त्यांच्या गायींना विषबाधा झाली. यात १६ गाई आणि ४ कालवडींचा मृत्यू झाला आहे तर ३० ते ४० गायी विषबाधा होऊन त्या अत्यवस्थ आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तळेकर यांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने पंचनामा केला आहे.

Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार बंद लासलगाव बाजार समिती, नेमकं कारण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *