Nashik News

Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार बंद लासलगाव बाजार समिती, नेमकं कारण काय?

बातम्या

Nashik News । कांद्याची पंढरी अशी नाशिकची लासलगाव बाजार समितीची (Lasalgaon Market Committee) ओळख आहे. परंतु आता ही बाजार समिती तब्बल 12 दिवस बंद राहणार आहे. सणासुदीच्या काळात कांदा (Onion) आणि धान्याचे लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. 18 तारखेपर्यंत हे लिलाव बंद राहणार आहेत. याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पत्र दिले आहे.

Havaman Andaj । राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

दिवाळी निमित्त व्यापारी लिलावात सहभागी होणार नाही, असे पत्र व्यापाऱ्यांकडून बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आले आहे. त्याशिवाय, शुक्रवारी ते शनिवारी नोव्हेंबरअखेर धान्य विभागातील व्यापारी धान्य या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नाही, त्यामुळे बाजार समिती (Lasalgaon Krushi Utpanna Bazar Samiti) बंद राहील. व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे.

Crop Insurance । आधार लिंक नसेल तर तुम्हालाही मिळणार नाही पिकविमा भरपाई, जाणून घ्या महत्त्वाचा नियम

विशेष म्हणजे याच बाजारपेठेतूनच देशभरात कांद्याचा पुरवठा केला जातो. दरम्यान, शिल्लक कांदा विकून दिवाळी साजरी करता येईल, अशी शेतक-यांना आशा होती. परंतु आता ती आशादेखील संपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. सणासुदीच्या तोंडावरच बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे.

Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *