Havaman Andaj । नोव्हेंबर महिना सुरु होताच तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Rain Alert) दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Crop Insurance । आधार लिंक नसेल तर तुम्हालाही मिळणार नाही पिकविमा भरपाई, जाणून घ्या महत्त्वाचा नियम
दरम्यान, आज पहाटेपासूनच रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे (Heavy Rain) सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. सध्या खरीप हंगामातील पीके काढणीला वेग आला आहे. त्यामुळे अनेकांनी पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.
Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या
या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांतअवकाळी पाऊस पडणार आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. केरळ आणि तमिळनाडू राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे.
Sandalwood Farming । शेतकऱ्यांनो करा ‘हे’ काम, तुम्हालाही चंदन लागवडीतून करता येईल करोडोंची कमाई
पुढील ६ दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. त्याशिवाय ढगाळ वातावरणामुळे उर्वरित राज्यात थंडीचा जोर कमी असणार आहे.
Krushi Yojna । मागेल त्याला योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? फक्त एकाच क्लिकवर तपासा