Krushi Yojna

Krushi Yojna । मागेल त्याला योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? फक्त एकाच क्लिकवर तपासा

शासकीय योजना

Krushi Yojna । राज्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकार सतत विविध योजना (Government Schemes) राबवत असते. शेतकरीदेखील या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असतात. पीएम किसान योजना (PM Kisan Yojana), पीएम मुद्रा योजना (PM Mudra Loan) तसेच शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह यांसाठी अनुदान दिले जाते. मागेल त्याला शेततळे ही देखील सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता.

Agriculture News । ऐकावं ते नवलंच! केवळ ४ तासात शेतकरी बनला कोट्याधीश, कसं ते जाणून घ्या

शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. जर पाणीच उपलब्ध नसेल तर पिकांना पाणी देणे अवघड होते. यावर्षी तर हिवाळा सुरु होण्यापूर्वी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेकजण शेततळे खोदतात. परंतु त्यासाठी देखील जास्त खर्च येतो. प्रत्येकाकडे पुरेशा प्रमाणात पैसे असतातच असे नाही. जर तुमच्याकडे देखील पैसे कमी असतील तर काळजी करू नका. आता तुम्ही सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Success Story । आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज ‘ही’ महिला शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल; संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

अशी होते कार्यवाही

या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाकडून करण्यात येते. तुम्ही अर्ज केल्यानंतर, पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणाऱ्या बँक खात्यावर जमा केले जाते.

Milk Rate | दूध उत्पादकांना मोठा झटका! गायीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांनी झाली घसरण, जाणून घ्या नवे दर

असे चेक करा तुमचे नाव

या योजनेत तुमच्या नावाचा समावेश आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सरकारच्या महाडीबीटी फार्मर स्कीम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/LotteryReport या पोर्टलवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी यावर क्लिक करावे लागणार आहे. तुम्ही योजना आर्थिक वर्ष माहिती निवडून लाभार्थी यादीत नाव पाहू शकता.

Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *