Abroad visit

Abroad visit । आता शेतकऱ्यांनाही करता येणार परदेश दौरा, काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

शासकीय योजना

Abroad visit । अलीकडच्या काळात शेतीत अनेक बदल झाले आहेत. शेतीची जवळपास सर्वच कामे यंत्रांच्या मदतीने केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होऊ लागली आहे. केंद्र आणि राज्य सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government scheme) सुरु करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो.

Abroad visit । आता शेतकऱ्यांनाही करता येणार परदेश दौरा, काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे योजना

सरकारची अशीच एक योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परदेश दौरा करता येणार आहे. नवीन कृषी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी सन २००४ पासून ‘राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना (Study tour scheme for farmers of the state abroad) सुरु करण्यात आली आहे. कृषी विभाग ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत प्रस्तावित खर्चाच्या सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चाला कृषी विभागाकडून अध्यादेशाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

Crop Damage Compensation । ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात ६५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटींची मदत मंजूर

या योजनेअंतर्गत एकूण १२० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी ही योजना सतत बंद पडत होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला पुन्हा सुरुवात करता यावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान या बाबत राज्याच्या कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी २ जानेवारी २४ रोजीच्या प्रस्ताव सादर केला.

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

या ठिकाणी साधा संपर्क

लवकरच परदेश दौऱ्यासंदर्भात कृषी विभागाकडून अधिकृत पत्राद्वारे जाहीर सूचना देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

Onion । ‘या’ तंत्रज्ञानामुळे साठवणूक केलेला कांदा कधीच सडणार नाही, कसे ते जाणून घ्या

जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता

  • सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्याने पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केला नसावा
  • शेतकऱ्याच्या नावे ‘सातबारा’, आठ ‘अ’चा उतारा असावा. शेतकऱ्याचे वय २१ ते ६२ च्या दरम्यान असावे.
  • शेतकऱ्याकडे पासपोर्ट आणि तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा.
  • शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट

TOP 5 Tractor Under 3 Lakh । हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त ट्रॅक्टर, मिळेल शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *